Ad will apear here
Next
किफायतशीर लिक्विड फंड
काही वेळा एकरकमी मिळालेली रक्कम पुढील गुंतवणुकीची दिशा ठरवेपर्यंत बँकेच्या बचत खात्यांमध्ये शिल्लक असते. बचत खात्यांचे व्याजदर साडेतीन ते चार टक्क्यांपेक्षा अधिक नाहीत. त्यामुळे अशा वेळी सहा ते आठ टक्क्यांपर्यंत परतावा देणारे लिक्विड म्युच्युअल फंड उपयुक्त ठरतात. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या लिक्विड फंडांबद्दल...
......
घर, जमीन यांसारख्या विक्री व्यवहारांतून, रिटायरमेंटनंतर, बँकेतील ठेवीची किंवा पीपीएफची मुदत संपल्यावर किंवा शेअर्स/म्युच्युअल फंड विक्रीनंतर मोठी रक्कम आपल्या खात्यात जमा होते. अशी रक्कम आपल्याला एकरकमी गुंतवायची नसते. अशा वेळी रक्कम बचत खात्यात राहिली, तर सध्या केवळ ३.५ टक्के इतकेच व्याज मिळू शकते. गुंतवणुकीबाबत निर्णय होण्यास कधीकधी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साहजिकच साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न (परतावा) मिळविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असतो. यासाठी लिक्विड म्युच्युअल फंड हा अगदी योग्य पर्याय आहे. 

म्युच्युअल फंडच्या लिक्विड स्कीममधील गुंतवणूक विविध प्रकारच्या लघू मुदतीच्या (शॉर्ट टर्म) म्हणजेच ज्यांची मुदत पुढील ९१ दिवसांत संपणार असते, असे कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट यांमध्ये केली जाते. त्यातही बहुतेक म्युच्युअल फंड ज्या गुंतवणूक पर्यायांची मुदत पुढील १५ ते २० दिवसांतच संपणार आहे, असे पर्याय प्रामुख्याने निवडतात. त्यामुळे अशी गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची होते. शिवाय सहा ते सात टक्के इतका रिटर्न मिळू शकतो. विशेष म्हणजे आपण रक्कम गुंतविल्यापासून ती काढेपर्यंत वरील दराने रिटर्न मिळू शकतो आणि आपल्याला हवी तेवढी रक्कम हवी तेव्हा काढता येते. आपण दुपारी दोन वाजेपर्यंत रीडम्पशन स्लीप दिल्यास कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते. यासाठी कुठलेही चार्जेस (एक्झिट लोड) पडत नाहीत.

याशिवाय आपल्याला अशी रक्कम शेअर्स अथवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायची असेल आणि शेअर बाजार तेजीत असेल, तर अशा वेळी आपल्याकडील रक्कम लिक्विड फंडात गुंतवून त्यातून योग्य वेळी शेअर्समध्ये किंवा एसटीपी (सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) पद्धतीने ती आपल्याला हव्या त्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकता. यामुळे मार्केटमध्ये तेजीमुळे असणारी जोखीम आपण कमी करू शकतो. 

करनियोजनाच्या दृष्टीनेही लिक्विड फंड, सेव्हिंग्ज अथवा शॉर्ट टर्म डिपॉझिटपेक्षा फायदेशीर ठरू शकतात. आपण १० किंवा २० टक्के टॅक्स स्लॅबमध्ये असाल, तर ‘ग्रोथ ऑप्शन’ निवडणे फायदेशीर ठरते आणि ३० टक्के स्लॅबमध्ये असाल, तर ‘डिव्हिडंड ऑप्शन’ घेणे फायदेशीर ठरते.

सध्याचे बँकांचे व्याज दर व त्यात भविष्यात होणारी आणखी घसरण विचारता घेता सामान्य गुंतवणूकदाराने या पर्यायाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. पारंपरिक गुंतवणुकीतून होणारे नुकसान विचारात घेता योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊन लिक्विड फंडात गुंतवणूक जरूर करावी.

एएए रेटिंग असलेल्या पाच प्रमुख लिक्विड फंडांचा ‘ग्रोथ ऑप्शन’ निवडल्यानंतर अनुक्रमे एक, तीन आणि पाच वर्षांनी किती टक्के परतावा मिळतो, याची आकडेवारी सोबत देत आहे. त्यावरून या लिक्विड फंडांचे महत्त्व कळू शकेल.

- बिर्ला सनलाइफ कॅश प्लस – ७.७० – ८.४६ – ८.८७
- आयसीआयसीआय लिक्विड फंड - ७.७३ – ८.४१ – ८.८३
- एचडीएफसी लिक्विड फंड – ७.६७ – ८.३९ – ८.७९
- रिलायन्स लिक्विड फंड - ७.६७ -८.३७ – ८.८०
- अॅक्सिस लिक्विड फंड - ७.७० - ८.३९ - ८.८१

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZJYCI
Similar Posts
एसडब्ल्यूपी म्हणजे काय? मागील लेखात आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या एसआयपी या पर्यायाबाबत माहिती घेतली. असाच आणखी एक पर्याय आहे ‘एसडब्ल्यूपी.’ ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज त्याची माहिती घेऊ या...
....असे करा आर्थिक नियोजन योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केल्यास आपली उद्दिष्टे सहज साध्य होऊ शकतात. त्यासाठी आपल्या उत्पन्नाच्या आधारावर कशी, कुठे गुंतवणूक करावी याची सविस्तर माहिती आजच्या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
‘एसआयपी’द्वारे गुंतवणुकीचे फायदे ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक कशी करायची याबाबत आपण मागील एका लेखात माहिती घेतली होती. ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो, याबाबत आज पाहू या.... ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
तुम्हाला ‘एसआयपी’बद्दल माहिती आहे? शेअर बाजाराची फारशी माहिती नसतानाही तुलनेने कमी जोखीम घेऊन बँकेतील गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा मिळवायचा असेल, तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या ‘एसआयपी’बद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language